पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कबीर सिंह' च्या स्क्रीनिंगसाठी एक्स कपल हरलिन- विकीची उपस्थिती

विकी हरलिन

शाहिदचा चित्रपट 'कबीर सिंह' २१ जूनला प्रदर्शित झाला. मात्र प्रदर्शनापूर्वी खास बॉलिवूड कलाकारांसाठी स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्क्रीनिंगसाठी छोट्या पडद्यावरील कलाकारांसह  अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते.  बॉलिवूडमधली काही जोडपीही या स्क्रीनिंगसाठी आली होती. मात्र या सर्वात बॉलिवूडमधलं एक्स कपल हरलिन आणि विकीनं सर्वांचं लक्ष वेधलं. 

शाहिदच्या 'कबीर सिंह'नं रचला नवा विक्रम

हरलिन सेठी आणि विकी कौशल ही जोडी गेल्या कित्येक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होती. या दोघांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिलं देखील गेलं. विकीचा 'उदी द सर्जिकल  स्ट्राईक' हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत विकी आणि हरलिन एकत्र होते. या चित्रपटाचं यशही दोघांनी एकत्र साजरं केलं होतं. मात्र त्यानंतर दोघांच्या नात्यात वितुष्ट आलं. या दोघांचं बेक्रअप झाल्याच्या चर्चा रंगल्या. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या 'हिंदुस्थान टाइम्स मोस्ट स्टाईलिस्ट अवॉर्ड शो' मध्येही विकीनं सिंगल असल्याचं मान्य केलं.  हे ब्रेकअप कतरिना कैफमुळे झालं असल्याचंही म्हटलं जातं होतं, नंतर मात्र भूमि पेडणेकर या अभिनेत्रीमुळे विकी हरलिनमध्ये ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या. या दोघांनी या प्रकरणात मौन धारण करणच पसंत केलं. 

'बिग बॉस'च्या घराबाहेर काढण्यासाठी राजकीय कट रचला, बिचुकलेंचा आरोप

बऱ्य़ाच महिन्यांनंतर 'कबीर सिंह' च्या स्पेशल स्क्रीनिंग निमित्तानं ही जोडी एका छताखाली वावरताना दिसली. मात्र दोघांनीही एकमेकांपासून अंतर ठेवणचं पसंत केलं.