पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कलंक' आलियासोबतचा शेवटचा सिनेमा का विचारल्यावर वरुण म्हणाला...

वरुण धवन आणि आलिया भट

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री आलिया भट यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री बघायला अनेकांना आवडते. सिनेमात हे दोघे एकत्र आहेत, म्हणूनही अनेक प्रेक्षक तो चित्रपट पाहायला जातात. या दोघांची भूमिका असलेला कलंक प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. पण यापुढे काही महिने हे दोघेही एकत्रितपणे कोणताही सिनेमा करणार नाहीत. दोघांच्या हातात वेगवेगळे सिनेमे असल्यामुळे पुढील काही महिने तरी प्रेक्षकांना वरुण आणि आलिया एकत्रितपणे एका सिनेमामध्ये दिसणार नाहीत.

याबद्दल 'डीएनए'ला दिलेल्या मुलाखतीत करण म्हणाला, पुढचे काही महिने आम्ही एकत्रितपणे कोणताही सिनेमा करणार नाही, हे खरं आहे. यालाच तर आयुष्य म्हणतात. तिच्या हातात असलेले सिनेमे वेगळे आहेत. त्यामध्ये ब्रह्मास्त्र, आरआरआर, इन्शाअल्लाह यांचा समावेश होतो. माझ्या हातात असलेले सिनेमे वेगळे आहेत. त्यात कुली नं. १, स्ट्रीट डान्सर, नेक्स्ट यांचा समावेश होतो. यामुळे आम्हाला दोघांनाही वैयक्तिक वेळ मिळणार आहे. शशांक खैतान यांचा 'रणभूमी' सिनेमा होण्यासाठी तर अजून वर्षभर लागणार आहे, असेही वरुण धवनने सांगितले. 

वरुण आणि आलिया सध्या कलंकच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. कलंकमध्ये मोठी स्टारकास्ट आहे. ज्यामध्ये आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, माधुरी दीक्षित यांचाही समावेश आहे. वरुण आणि आलिया यांनी २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्टुंड्टस ऑफ द इयर' सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.