पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ढिशूम'चा सीक्वल येणार

ढिशूम

वरुण धवन, जॉन अब्राहम आणि जॅकलीनची प्रमुख भूमिका असलेल्या 'ढिशूम' चित्रपटाचा स्वीक्वल येणार आहे. वरुणचा भाऊ रोहित धवनचा 'ढिशूम' हा दुसरा चित्रपट होता.  'ढिशूम' ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर 'ढिशूम' चित्रपटाचा स्वीक्वल येणार आहे अशा चर्चा आहेत.

एकता कपूरनं नवोदित दिग्दर्शकाला भेट दिली आलिशान कार

वरुण धवन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसेल अशाही चर्चा आहेत. रोहित धवननं या चित्रपटाच्या कथेवर काम करायला सुरुवात केली आहे. मुंबई मिररच्या माहितीनुसार पुढील वर्षी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. तर २०२१ ला  चित्रपट प्रदर्शित होईल. भारताव्यतिरिक्त परदेशातही चित्रीकरण होईल २०२० च्या मध्यानंतर चित्रीकरणाला सुरुवात होईल अशीही माहिती संबधित वृत्तपत्रानं सुत्रांच्या हवाल्यानं दिली.  

१७ वर्षांनी येतोय 'हंगामा २', परेश- शिल्पा दिसणार मुख्य भूमिकेत

 वरुण धवनचे २०२०- २१ वर्षांत अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पुढील वर्षांत त्याचा स्ट्रीट डान्सर ३ डी, कुली नंबर १ चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर तो एका बायोपिक ही दिसणार आहे. शशांक खैतानच्या आगमी 'मिस्टर लेले' चित्रपटातही तो प्रमुख भूमिकेत आहे.