पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तारखाच उपलब्ध नसल्यानं 'मिस्टर लेले'चं चित्रीकरण रद्द

मिस्टर लेले

जानेवारी महिन्यात वरुण धवनच्या 'मिस्टर लेले' या आगामी  चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. चित्रपट प्रदर्शित व्हायला वर्षभराचा अवधी असताना हटके पोस्टर लाँच करुन या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रसिद्धी करण्यात आली होती, त्यामुळे चित्रीकरण सुरु होण्यापूर्वीच बॉलिवूडमध्ये हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला होता. मात्र आता 'मिस्टर लेले' चित्रपटाचं चित्रीकरण पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कलाकारांकडे तारखा उपलब्ध नाहीत त्यामुळे चित्रीकरणाच्या वेळाच जुळून येत नसल्यानं  तूर्त हा चित्रपट होणार नाही असं समजत आहे. 

‘मीडियम स्पाइसी’तून ४० वर्षांनंतर सिनेसृष्टीत परतणार ही अभिनेत्री

शशांक खैतान यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. वरुण, मी आणि करण जोहरनं संगनमतानं चित्रपटाचं चित्रीकरण पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला चित्रपटाची कथा खूपच आवडली. चित्रीकरण पुढे ढकलण्याचा निर्णय खूपच कठीण होता, मात्र काही गोष्टी जुळून येत नाही, मला खात्री आहे की भविष्यात या चित्रपटाच्या निमित्तानं किंवा इतर चित्रपटाच्या निमित्तानं मी आणि वरुण एकत्र नक्की काम करु'  असा विश्वास खैतान यांनी ट्विटद्वारे व्यक्त केला आहे.

मृण्मयीची बहीण नव्या मालिकेत, शेअर केला पहिलावहिला अनुभव

या चित्रपटाची हटके जाहीरात करण्यात आली होती, त्यामुळे  प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल खूपच कुतूहल होतं. १ जानेवारी २०२१ मध्ये  हा चित्रपट प्रदर्शित होण्याऱ्या चित्रपटाची घोषणा जानेवारी २०२० मध्येच करण्यात आली होती मात्र आता चित्रपटाचं चित्रीकरणच सुरु होणार नसल्यानं वरुणचे चाहते मात्र नाराज आहे.

सैफवर नाराज नाही, काजोल म्हणते सारं काही आलबेल