पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ब्लड प्रेशर कमी झाल्यानंतरही वरुणने केलं १८ तास काम

वरुण धवन

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या कोरिओग्राफर रेमो डिसोझा दिग्दर्शित 'स्ट्रीट डान्सर ३ डी' या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. मागील ६ महिन्यापासून चित्रपटाचे चित्रिकरण सुरु असून संपूर्ण टीम यासाठी मेहनत घेत आहे. चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान वरुण धवन बेशुद्ध झाल्याचे समोर येत आहे. 

चित्रपटातील एका डान्सच्या मुव्हमेंटला वरुन धवन चक्क बेशुद्ध होऊन पडला. त्यानंतर उपचारावेळी त्याला रक्तदाब (ब्लड प्रेशर) कमी झाल्याचे सांगत डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्ला. त्यानंतर वरुणने चित्रकरण थांबले. मात्र, अवघ्या एका दिवसाच्या विश्रांतीनंतर २६ जुलैला सेटवर पुन्हा परतत त्याने तब्बल १८ तास काम केले.  

अग्गंबाई सासूबाई मालिकेतील सोहम आहे 'या' ज्येष्ठ संगीतकारांचा मुलगा

वरुण धवन सोबत या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भुमिका साकारताना दिसणार आहे. या जोडीचा 'स्ट्रीट डान्सर ३ डी' हा चित्रपट २४ जानेवारी २०२० ला प्रेक्षकांच्या बेटीला येणार आहे. वरुण आणि श्रद्धा यांच्याशिवाय चित्रपटात प्रभू देवा, राघव, नोरा फत्तेही यांच्या अप्रतिम डान्सची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: varun dhawan faints on sets of super dancer 3d due to low blood pressure pulls 18 hour shift after returning to work