पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जखमी डान्सरला वरुण धवनची ५ लाखांची आर्थिक मदत

वरूण धवन

अभिनेता वरूण धवननं जखमी डान्सरला ५ लाखांची आर्थिक मदत केली आहे. वरुणला एका इन्स्टाग्राम हँडलवरून या जखमी डान्सर तरुणाची माहिती समजली. माहिती मिळाल्यानंतर वेळ न दवडता वरूण जखमी डान्सरच्या मदतीला धावून आला त्यानं या डान्सरच्या उपचाराचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे.

टु द कल्चरच्या इन्स्टाग्राम पोस्टनुसार वरुणनं डान्सर  तरुणाला ५ लाखांची मदत केली आहे. एक किचकट डान्स स्टेप करताना हा तरूण गंभीर जखमी झाला. त्याची आर्थिक परिस्थिती ही बेताची होती. एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून  या तरुणाच्या उपचारासाठी मदत मागण्यात आली. वरुणनं ही पोस्ट पाहिली आणि मदत करण्याची तयारी दर्शवली. वरुणनं या जखमी तरुणाची माहिती घेऊन त्याच्या वैदयकिय उपचाराच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली असल्याचं या  इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

वरुण  स्वत: सध्या स्ट्रीट डान्सर या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. वरूणसह श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात तो डान्सरची भूमिका साकारत आहे. रेमो डिसूजा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. याव्यतिरिक्त वरूण धवन हा कुली  नंबर वनच्या रिमेकमध्येही दिसणार आहे. सारा अली खानची प्रमुख भूमिका या चित्रपटात असणार आहे.