पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वरूणचं लग्न धुम धडाक्यातच होईन पण...

वरूण नताशा

दीपिका- रणवीर, सोनम -आनंद, प्रियांका - निकनंतर आता बॉलिवूडमध्ये कोणती जोडी विवाहबंधनात अडकते याची उत्सुकता चाहत्यांना आहे. त्यातच दोन दिवसांपासून वरुण धवन आणि त्याची प्रेयसी नताशा दलाल लग्न करणार अशा चर्चा आहेत. यासाठी वरुणनं त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली असंही म्हटलं जात होतं. यावर वरुण आणि त्याचे वडील दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

टायगर- दिशाचं ब्रेकअप झाल्याच्या बॉलिवूडमध्ये चर्चा

वरूणचं लग्न धुम धडाक्यातच होईन, मात्र लग्नाची तारीख आणि जागा याबद्दल तुर्त चर्चा नको. वरुणचं लग्न व्हावं अशी आम्हा  सर्वांचीच इच्छा आहे.  लग्न ठरेन तेव्हा त्याच्या लग्नाबद्दल आम्ही अधिकृत  माहिती देऊ, अशी प्रतिक्रिया डेव्हिड धवन यांनी डेक्कन क्रोनिकला दिली. 

अशी झाली प्रिया- उमेशची पहिली 'भेट'

तर वरूण मात्र लग्नाच्या चर्चांमुळे चांगलाच नाराज झाला आहे. लग्नाबद्दल बातम्या नाकारून आता मला कंटाळा आला आहे असं म्हणत लग्नाच्या बातमीत तथ्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. वरूण आणि नताशा नोव्हेंबर २०१९ मध्ये लग्न करणार आहेत अशा चर्चा आहेत. यासाठी वरुणनं त्याचा आगामी चित्रपट 'स्ट्रीट डान्सर'च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याची विनंतीही केली असंही एका वेब पोर्टलनं म्हटलं होतं.