पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात स्टंट चित्रीत करताना मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला वरुण धवन

वरुण धवन

अभिनेता वरुण धवन हा  'कुली नंबर १' चित्रपटासाठी स्टंट चित्रीत करताना मोठ्या अपघातातून  थोडक्यात बचावला आहे. मिड डेच्या वृत्तानुसार पुण्यात एक कठीण स्टंटचं चित्रीकरण करताना दुर्दैवानं अपघात झाला आणि यातून वरुण थोडक्यात बचावला आहे.  

बॉबी म्हणतो, मुलाला अभ्यासात अधिक रस याचा अभिमान

 पुण्यात कुली नंबर १ साठी एक कठीण स्टंट चित्रीत करण्यात येत होता. कड्यावर उलट्याप्रकारे गाडी अडकली आहे, आणि त्यात मुख्य अभिनेता अडकला अशा प्रकारचं दृश्य चित्रीत करण्यात येत होतं. 'वरुणनं चित्रीकरण पूर्ण केलं. आणि त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की गाडीचा दरवाजाच उघडत नव्हता. हा कठीण स्टंट चित्रीत करण्याआधी त्याचा अनेकदा तज्ज्ञांच्या देखरेखेखाली सरावही करण्यात आला होता. सुरक्षेचीही पुरेपुरे काळजी घेण्यात आली होती. मात्र दुर्दैवानं हा स्टंट फसला', अशी माहिती सुत्रांनी मिड डेला दिली. 

अनाथ मुलांसाठी सौरउर्जा प्रकल्प, उद्धाटनासाठी सई मांजरेकर फलटणमध्ये

'गाडी अत्यंत टोकावर होती त्यातून वरुणला बाहेर काढणं हे मोठं आव्हान होतं. मात्र इतका कठीण प्रसंग असूनही वरुणनं अतिशय शांतपणे आणि संयमानं ही परिस्थिती हाताळली. स्टंट साहाय्यकाच्या मदतीनं अखेर गाडीत अडकलेल्या वरुणला सुखरुप बाहेर काढण्यात आलं', अशी माहितीही सुत्रांनी दिली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Varun Dhawan Coolie No 1 stunt goes horribly wrong escaped unhurt after getting stuck in a car