पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गोव्याच्या किनाऱ्यावर वरुण- नताशाचा विवाहसोहळा?

वरुण धवन- नताशा दलाल

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन मे महिन्यात विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा  आता सुरु झाल्या आहेत. वरुण गेल्या कित्येक वर्षांपासून नताशा दलालला डेट करत आहे. अनेक सार्वाजनिक ठिकाणी तो नताशासोबत वावरताना दिसतो. बॉलिवूड हंगामाच्या माहितीनुसार वरुण आणि नताशाचा गोव्यात मोठ्या थाटा माटात विवाहसोहळा पार पडणार आहे.  

'भुज'मध्ये राणा डगुबत्तीऐवजी मराठमोळ्या शरद केळकरची वर्णी

गोव्याच्या  किनाऱ्यावरील एका आलिशान हॉटेलमध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडणार अशा चर्चा आहेत. 'वरुण आणि नताशा गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. विशेष म्हणजे वरुणच्या आई- वडिलांना नताशा आवडली आहे, त्यामुळे ही जोडी लवकरच विवाहबंधान अडकणार आहे', अशी माहिती बॉलिवूड हंगामानं दिली आहे. 

अभिनेत्रीच्या घरावर प्राप्तिकर विभागाची धाड, २५ लाखांची रोकड जप्त

संगीत, मेहंदी, लग्न, रिसेप्शन अशा पंजाबी थाटामाटात दोघांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. वरुणच्या भावाचंही लग्न गोव्यात पार पडलं होतं त्यामुळे इथेच वरुणचंही लग्न होणार असल्याचं समजत आहे.