पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माझ्या नवऱ्याची बायको : ४० वर्षांनी कमबॅक केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?

वंदना पंडीत शेठ

टीआरपीच्या यादीत नेहमीच वरचढ असलेली झी मराठीवरची  'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका कथानकातील वेगळ्या वळणामुळे चर्चेत आहे. या मालिकेची नायिका 'राधिका' हिचं  'सौमित्र' बरोबर लग्न होणार आहे. या मालिकेत आता सौमित्रच्या आईची एण्ट्री झाली आहे. मालिकेच्या निमित्तानं प्रसिद्ध अभिनेत्रीने कलाविश्वात तब्बल ४० वर्षांनी कमबॅक केलं आहे.

ही अभिनेत्री म्हणजेच वंदना पंडीत- शेठ होय. वंदना पंडीत यांनी ४० वर्षांपूर्वी अभिनेता सचिन पिळगांवकर यांच्यासोबत 'अष्टविनायक' या सिनेमात काम केलं होतं. हा चित्रपट तेव्हा प्रचंड लोकप्रिय ठरला होता. त्यानंतर 'मुक्ता', 'मणी' सारख्या सिनेमांमध्ये छोट्या भूमिका वंदना यांनी साकारल्या.

माधुरी करणार मराठी चित्रपटाची निर्मिती, तेजश्री- आदिनाथ मुख्य भूमिकेत 

लग्नानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यवसायात व्यग्र झाल्यानं वंदना यांना अभिनयाकडे फारसा वेळ देता आला नाही. वंदना यांचा पुण्यात व्यवसाय आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी मालिकेच्या निमित्तानं अभिनयाच्या विश्वात पुनरागमन केलं आहे. 

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत नानींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुहिता थत्ते या वंदना शेठ यांच्या मैत्रिण आहेत. 'चांगली भूमिका असेल तर मला अभिनयात पुन्हा एकदा काम करायला आवडेल अशी इच्छा त्यांनी सुहिता यांच्याकडे व्यक्त केली होती.  त्यानंतर पंधरा वीस दिवसांनी झी मराठी वाहिनीकडून त्यांना सौमित्रच्या आईच्या भूमिकेबाबत विचारण्यात आलं. भूमिका चांगली असल्यामुळे वंदना यांनी होकार दिला आणि त्या शुटिंगकरता मुंबईत आल्या.

'गर्ल्स' मधल्या पहिल्या अभिनेत्रीचं नाव समोर