पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बोनी कपूर सोबतच्या 'त्या' फोटोवरून उर्वशी रौतेला भडकली, वाचा काय म्हणाली?

बोनी कपूर आणि उर्वशी रौतेला

अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या एका व्हिडिओवरून जाम भडकली आहे. एका लग्न समारंभात चित्रित करण्यात आलेल्या या व्हिडिओवरून तो शेअर करणाऱ्या माध्यम समूहावर उर्वशीने तिखट शब्दांत प्रहार केला आहे. संबंधित व्हिडिओ आणि त्यानंतर उर्वशीने घेतलेल्या भूमिकेमुळे सध्या बॉलिवूडमध्ये हाच मुद्दा चर्चेत आहे. 

काही दिवसांपूर्वी जयंतीलाल गडा यांचा मुलगा अक्षय गडा याच्या लग्न समारंभात उर्वशी आणि निर्माते बोनी कपूर भेटले. यावेळी बोनी कपूर यांनी उर्वशीला सगळ्यांसमोर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, असे सांगत एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला होता. याच व्हिडिओवरून उर्वशीचा पारा चढला आणि तिने या व्हिडिओतील एक स्क्रिन शॉट घेत ट्विट केले. या ट्विटमध्ये तिने अशा पद्धतीचा व्हिडिओ प्रसारित करण्यावर आक्षेप नोंदवला. उर्वशी म्हणते, देशातील एका मोठ्या वृत्तपत्राने एक व्हिडिओ बातमी म्हणून शेअर केला आहे. ती खरंच बातमी आहे का? तुम्हाला जर महिलांचा आदर करणे म्हणजे नक्की काय, हेच कळत नसेल, तर तुम्ही महिलांची सत्ता, त्यांचे स्वातंत्र्य याबद्दल अजिबात बोलू नका. 

लग्न समारंभात उर्वशी रौतेला हिला बोनी कपूर यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्यानंतर तिने सर्वांसमोरच त्यांचा हात आपल्यापासून दूर केला होता. हे सर्व कॅमेऱ्यात चित्रित झाले होते. आता हाच व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्यामुळे उर्वशी भडकली आहे. 

२०१५ मध्ये उर्वशीने मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याचवर्षी तिला मिस दिवा २०१५ हा किताबही मिळाला होता. सनी देओलच्या सिंग साब दे ग्रेट चित्रपटातून उर्वशीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर सनम रे, ग्रेट ग्रँड मस्ती याही चित्रपटांतून तिने काम केले. उर्वशीला चित्रपटांमधील भूमिकेपेक्षा आयटम साँगमुळे अधिक प्रसिद्धी मिळाली. भाग जॉनीमधील डॅडी मम्मी, काबीलमधील हसीनों का दिवाना या गाण्यांमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली.