पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'उरी..'चा जोश १०० दिवसांनंतरही कायम

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’

जम्मू- काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केलानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सत्य घटनेवर आधारित 'उरी : द सर्जिकस स्ट्राईक्स' हा चित्रपट जानेवारी २०१९ मध्ये प्रदर्शित झाला. विषेश म्हणजे विकी  कौशलचा उरी प्रदर्शित होऊन १०० दिवस उलटले तरी चित्रपटाचा जोश अद्यापही  कायम आहे.

गेल्या काही वर्षांत क्वचितच एखादा चित्रपट इतके दिवस चित्रपटगृहात आपला जम बसवून असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है. ये घर मै घुसेगा भी और मारेगा भी’, असं म्हणत ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातून भारताच्या सूडाची कहाणी सांगण्यात आली आहे. या चित्रपटातले संवाद प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरले. हा चित्रपट २०१९ मधला पहिला सुपरहिट चित्रपट ठरला. 

विशेष म्हणजे फेब्रुबारी महिन्यात चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झालेली पहायला मिळाली. पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४२ जवान शहीद झाले. उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्करावर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी होता. या हल्ल्यानंतर 'उरी' चित्रपटाकडे अनेक प्रेक्षक वळलेले पहायला मिळाले. अवघ्या ४० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार केलेल्या  या चित्रपटानं सहापट कमाई करत २५० कोटींहून अधिकचा गल्ला कमावला.

अनेक मोठ्या  स्टार्सचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दोन ते ३ आठवडे तग धरून राहतात अशात उरीनं  अपवादात्मकरित्या  उत्तम यश संपादन केलं अशा शब्दात चित्रपट व्यापार विश्लेषक तरण  आदर्शनं चित्रपटाचं कौतुक केलं आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Uri the surgical strike completes 100 days in theatres An achievement extremely rare in today times