पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून सरसेनापती हंबीरराव तुमच्या समोर हजर'

'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आज शिवजयंतीचं औचित्य साधत 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. 

The Neighbors Window :शेजाऱ्यांच्या घरात डोकावून पाहताना बदलेलं आयुष्य

चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे हे हंबीरराव मोहिते यांच्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. 'छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून सरसेनापती हंबीरराव तुमच्या समोर हजर ... भव्यदिव्य शिवपरंपरा तुमच्यासाठी लवकरच' असं लिहित प्रविण तरडेंनी चित्रपटाचा लूक प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे. 

'फत्तेशिकस्त'ला 'मराठा लाइट इन्फंट्री'मध्ये मानाचे स्थान
 

जणू सह्याद्रीचा कडा , श्वास रोखुनी खडा... छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून सरसेनापती हंबीरराव तुमच्या समोर हजर ... ...

Posted by Pravin Vitthal Tarde on Tuesday, February 18, 2020

जणू सह्याद्रीचा कडा , श्वास रोखुनी खडा... अशा शब्दात सरसेनापती हंबीररावांचं वर्णन प्रवीण तरडेंनी केलं आहे. 'देऊळबंद' आणि 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटांनंतर प्रवीण तरडे या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जूनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.