पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : 'चोरीचा' धम्माल 'मामला' !

चोरीच मामला

दमदार स्टारकास्ट आणि पुरेपूर मनोरंजन करणारं कथानक असलेल्या 'चोरीचा मामला' या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, कीर्ती पेंढारकर, अनिकेत विश्वासराव आणि क्षिती जोग अशी तगडी  स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रियदर्शन जाधवनं केलं आहे.

बहिणीच्या उपचारासाठी वाईटातल्या वाईट चित्रपटातही काम केलं

एका चोरीमुळे होणारी गुंतागुंत या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चित्रपटाची संकल्पनाच मजेशीर आहे, त्यात प्रासंगिक विनोद, खुमासदार संवादांचा तडका या कथानकाला मिळाला आहे. त्याशिवाय ताल धरायला लावणारं संगीत हेही चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. जितेंद्र जोशी, मंगेश कांगणे, जय अत्रे यांनी चित्रपटाची गाणी लिहिली असून चित्रपटाचे संगीत चिनार महेश यांचे आहे तर चित्रपटाचे शीर्षक गीत प्रफुल्ल-स्वप्नील यांचे आहे. शाल्मली खोलगडे, प्रियांका बर्वे, चिनार खारकर,  स्वप्नील गोडबोले, कविता यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. या चित्रपटामुळे प्रेक्षकांना पूरेपूर मनोरंजन मिळणार हे ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे. 

येत्या ३१ जानेवारीला हा धमाल, विनोदी असा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘काळ’ ठरणार रशियामध्ये प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट