पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गर्दीतल्या दर्दींची गोष्ट सांगणारी 'फोमो' वेबसीरिज

फोमो

'स्त्रिलिंग पुल्लिंग' या वेब सीरिजला मिळालेल्या तुफान यशानंतर आता  शुद्ध देसी मराठी 'फोमो- गर्दीतले दर्दी' नावाची नवी कोरी वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  ६ भागांची ही वेब सीरिज ५ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

अंदाज अपना अपना : प्रेक्षकांचं २५ वर्षांचं 'अमर प्रेम' आणि हिट डायलॉग

फोमो म्हणजेचा 'फिअर ऑफ मिसिंग आउट'. फोमो ही अत्यंत साधी, सरळ, सोप्पी गोष्ट आहे.  एका लहान गावातून मोठ्या शहरात येणाऱ्या  आणि या मोठ्या शहरात स्वत:ला सामावून घेण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीवर ही वेबसीरिज आधारलेली आहे.

ईदला अक्षय- सलमानची टक्कर अटळच

'फोमो - गर्दीतले दर्दी' या विनोदी वेब सीरिजचं दिग्दर्शन सुशांत धारवाडकर आणि चिन्मय कुलकर्णी यांनी केलं आहे. या वेबसीरिजमध्ये पर्ण पेठे, अभिषेक देशमुख, रुचिता जाधव, चेतना चिटणीस हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याव्यतिरिक्त अभिनेता सागर कारंडेदेखील फोमोमधून आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.