पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सहकुटुंब सहपरिवारा'सह सुनील- नंदिता पहिल्यांदाच येत आहेत प्रेक्षकांच्या भेटीला

‘सहकुटुंब सहपरिवार’

कवयित्री विमल लिमये यांची ‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती,’ ही कविता प्रसिद्ध आहे. या कवितेतील विचार खरी करणारी आणि नात्यांचा शोध घेणारी ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका २४ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेच्या नावाप्रमाणेच ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. आताच्या घडीला बरेच जण विभक्त कुटुंबाकडे वळत असताना एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व ही मालिका नक्कीच पटवून देईल. सुनील बर्वे आणि नंदिता पाटकर या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. सरिता आणि सूर्या असं त्यांच्या पात्राचं नाव असून कुटुंबाच्या सुखासाठी आणि कुटुंब एकत्र बांधून ठेवण्यासाठी त्यांनी केलेला त्याग हा मालिकेचा महत्त्वाचा दुवा आहे.

खुशखबर! 'मिस्टर इंडिया'च्या कथेवर काम सुरु

स्टार प्रवाहवरील प्रत्येक मालिकेतून वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. या वेगळ्या प्रयत्नाला प्रेक्षकांचंही भरभरुन प्रेम मिळत आहे. सहकुटुंब सहपरिवार या मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘सहकुटुंब सहपरिवार एक अशी मालिका आहे जी संपूर्ण कुटुंबासाठी बनवण्यात आली आहे. टीव्हीवर सशक्त आशय दाखवण्याच्या हेतूने करण्यात आलेला आणखी एक प्रयत्न. मराठी परंपरा जपणारी, मराठी प्रेक्षकांना नेमकं काय बघायला आवडेल याचं भान ठेवून सादर केली जाणारी घरगुती गोष्ट. आई कुठे काय करते मालिकेतील आई जशी घराघरात पोहोचली आहे अगदी त्याचप्रमाणे सहकुटुंब सहपरिवार ही मालिकाही पोहोचेल. संवेदनापूर्ण या मालिकेचा प्रत्येक भाग मनाला भिडेल ही खात्री आहे.’

PHOTOS : तैमुरची ग्लॅमरस आई

अतिशय विनम्र आणि मवाळ असं हे पात्र आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व पटवून देणारी ही मालिका आहे, असं या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना सुनील बर्वे म्हणाले.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:upcoming marathi serial Sahakutumba sahaparivar sunil barve nandita patker work in lead role