पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'झोलझाल'मध्ये मराठीतले जय-वीरू

'झोलझाल'मध्ये मराठीतले जय-वीरू

शोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती इंटरनॅशनलची निर्मिती असलेल्या 'झोलझाल'च्या निमित्ताने जय वीरूच्या भूमिकेतून आपल्याला भेटणार आहेत. मानस कुमार दास यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

'लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली', चला हवा येऊ द्या वादात

चित्रपटामध्ये हास्य आणि विनोद याची छान पर्वणी पाहायला मिळणार हे टिझर पोस्टर पाहून लक्षात येत आहे. जय आणि वीरूच्या या छान जोडीचं मराठी  पडद्यावरच 'झोलझाल' रूप पाहायला धम्माल येणार हे नक्की. 'झोलझाल' मधल्या जय वीरूचं पडद्यावरील नातं जितकं सुंदर पाहायला मिळतंय तितकच पडद्यामागेही त्यांनी धम्माल केली असावी असं पोस्टरच्या झलकमधे दिसून येतंय. 

PHOTOS : 'मलंग'च्या पार्टीत दिशाचा रेड हॉट लूक

 'ऑन स्क्रीन बंध तेव्हाच रंगत आणतात जेव्हा ऑफ स्क्रीन मैत्री तेवढीच जवळची आणि रंजक असते. येत्या १ मे ला तुम्हाला पडद्यावर ती पाहायला मिळेलच. शूट दरम्यान आमची ओळख झाली. या चित्रपटाने आम्हाला मैत्री दिली. जय आणि वीरू या गाजलेल्या जोडीला पुन्हा नव्या रूपात सादर करण्याची संधी झोलझालमुळे आम्हाला मिळाली. शूट दरम्यान आम्ही खूप धम्माल केली. सेटवर सगळ्यांसोबत खूप खोड्या देखील केल्या कदाचित त्याचमुळे हा चित्रपट करताना सर्वच कलाकारांना मज्जा आली आणि आम्हाला जय वीरू साकारताना मदत झाली. मनोरंजनाचा गुलदस्ता आणि विनोदचा हास्यकल्लोळ घेऊन लवकरच आम्ही जय वीरूच्या रूपात तुमच्या भेटीला येऊ.' असं 'झोलझाल'चे जय वीरू, अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके म्हणाले. हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होत आहे. 

PHOTOS : दीपिकाच्या हॉट लूकनं चाहतेही घायाळ