पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO :'पिरमाचा इस्कोट की किडनीचा घोळ.?, विकून टाक'चा धमाकेदार ट्रेलर

विकून टाक

मराठी सिनेसृष्टीला 'पोश्टर बॉईज', 'पोश्टर गर्ल' सारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक समीर पाटील घेऊन येत आहेत एक भन्नाट चित्रपट 'विकून टाक'. एव्हाना चित्रपटाचा पोस्टर, टिझर बघून थोडीफार कल्पना आलीच असेल, की यातही काहीतरी धमाकेदार पाहायला मिळणार. या चित्रपटातील 'दादाचं लगीन', 'डोळ्यामंदी तुझा चांदवा' या गाण्यांनाही रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांची हीच उत्सुकता आता अधिक वाढवण्यासाठी घेऊन आलो आहोत 'विकून टाक'चा जबरदस्त ट्रेलर. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा कलाकारांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थित मुंबईत पार पडला. बऱ्याच काळाने मराठी सिनेसृष्टीत मोठा विनोदी चित्रपट प्रदर्शित होत असल्याने शिवाय चंकी पांडेसारखा नावाजलेला बॉलिवूड कलाकार या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीमध्ये पदार्पण करत असल्याने उपस्थितांचा उत्साह द्विगुणित झाला होता.

'भुज'मध्ये राणा डगुबत्तीऐवजी मराठमोळ्या शरद केळकरची वर्णी

 ट्रेलरवरून ही कथा देखील ग्रामीण भागात घडणारी असून या गावातील हॅण्डसम मुलगा 'मुकुंद तोरांबे' याच्या अवतीभवती फिरणारी आहे. सर्वसामान्य आयुष्य जगत असतानाच त्याच्या आयुष्यात काही घटना घडताना दिसत आहेत, त्यातच अधिक भर म्हणून त्याच्या आयुष्यात एक अनपेक्षित पाहुणाही आलेला दिसतोय. हा दुबईहून आलेला पाहुणा मुकुंदला का शोधतोय? मुकुंद आणि त्या अरब शेखचे काय कनेक्शन? आणि या सगळयात गावकऱ्यांच्या मनात उपस्थित झालेल्या शंका, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे चित्रपट आल्यावरच कळतील. तत्पूर्वी ट्रेलरवरून चित्रपट धमाल असणार, हे नक्की.

गोव्याच्या किनाऱ्यावर वरुण- नताशाचा विवाहसोहळा?

 मुळात एखादा सामाजिक विषय हलक्याफुलक्या, विनोदी पद्धतीने मांडला तर तो प्रेक्षकांना अधिक भावतो, असे मानणाऱ्या समीर पाटील यांनी 'विकून टाक'द्वारेही काहीतरी प्रबोधनात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात हा संदेश कोणता, हे जाणून घेण्यासाठी मात्र ३१ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागेल. या चित्रपटात  शिवराज वायचळ, चंकी पांडे, रोहित माने, राधा सागर, ऋतुजा देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.