पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शहीद भाई कोतवाल : कमलेश सावंत शहीद गोमाजी पाटील यांच्या भूमिकेत

कमलेश सावंत

अनेक हिंदी, मराठी चित्रपटातून लक्षवेधी अभिनय करणारे कमलेश सावंत स्वातंत्र्य सेनानीच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. बहुचर्चित 'शहीद भाई कोतवाल' या चित्रपटात कमलेश शहीद गोमाजी पाटील यांची व्यक्तीरेखा साकारत आहेत. २४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

Video : सायली- सुव्रतच्या ‘मन फकिरा’चा टीझर प्रदर्शित

'शहीद भाई कोतवाल' या चित्रपटात भाई कोतवाल यांच्यासह गोमाजी पाटील आणि हिराजी पाटील या बाप लेकांच्या शौर्याची कथा पाहायला मिळणार आहे. एक प्रेरणादायी इतिहास या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल, अशी भावना कमलेश सावंत यांनी व्यक्त केली. शहीद भाई कोतवाल यांनी ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र सेना स्थापन केली. वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांना वीरमरण आलं. त्यांची शौर्यकथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. एकनाथ देसले आणि पराग सावंत यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून कथा पटकथा संवाद आणि गीते एकनाथ देसले यांनी लिहिली आहेत.

' TikTok' व्हिडिओमधून भावना दुखावल्याबद्दल दीपिकानं माफी मागावी- कंगना

या चित्रपटात आशुतोष पत्की, ऋतुजा बागवे, निशिगंधा वाड, माधवी जुवेकर, अरुण नलावडे, गणेश यादव, पंकज विष्णू, मिलिंद दस्ताने, सिद्धेश्वर झाडबुके, श्रीरंग देशमुख, अभय राणे, परेश हिंदुराव, प्राजक्ता दिघे आदींच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.