पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : 'सलमान'च्या तालावर थिरकली शिवानी- सायली

सातारचा सलमान

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सातारचा सलमान' चित्रपट पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘सातारचा सलमान' असे बोल असलेल्या या धमाकेदार गाण्यात सुयोग गोऱ्हे, सायली संजीव, शिवानी सुर्वे, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे असे मराठी कलाकार दिसत आहेत. प्रत्येकालाच ठेका धरायला लावणाऱ्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले असून अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजानं गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार यांनी केले आहे.

सलमानसोबतच्या नात्याविषयी कतरिना म्हणते...

या गाण्याचा एक गंमतीशीर किस्सा दिग्दर्शक हेमंत ढोमेनं शेअर केला आहे. हे गाणं चित्रित करण्यापूर्वी हेमंतच्या डोक्यात काही कल्पना होत्या. मुळात हे गाणे खूपच उत्स्फूर्त, जल्लोषमय असल्यानं चित्रीकरणाचा परिसरही त्याला तसाच कलरफूल, उत्साहवर्धक हवा होता. या चित्रपटाचं बरंच चित्रीकरण हे साताऱ्यातील गावांमध्ये चित्रीत झाल्याने तिथे रंगीबेरंगी घरे दिसण्याची तशी शक्यताच नव्हती. अखेर हेमंतनं गावाच्या चौकातल्या सगळ्या घरांना वेगवेगळे रंग देण्याचे ठरवले हेमंतची कल्पना सर्वांनाच आवडली. अगदी गावकरी येऊन येऊन आपल्या आवडीचे रंग सांगत होते.  अखेर प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार घरांना रंग दिला आणि हेमंतला जे अपेक्षित होते ते गाण्यात उतरले. चित्रीकरण संपल्यानंतरही साताऱ्यातील केंजळ या गावात ही रंगीबेरंगी घरे पाहायला मिळतात.

हृतिक- दीपिका राम- सीतेच्या भूमिकेत तर प्रभास साकारणार रावण?

सुयोग गोऱ्हे, सायली संजीव, शिवानी सुर्वे यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.