पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सातारचा सलमान' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

सातारचा सलमान

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच  चित्रपटसृष्टीच्या जादुई दुनियेची भुरळ असते. सामान्य माणसं तर या झगमगत्या दुनियेला आणि त्यात वावरणाऱ्या कलाकारांना आपल्या रोजच्या जीवनाचाच एक भाग समजतात, काही तर आपला आदर्श मानतात. कलाकारांबद्दल एक वेगळ्याच प्रकारचे आकर्षण सर्वांमध्ये पाहायला मिळते. अगदी नकळतपणे आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना विशिष्ट कलाकारांच्या नावाची ओळख द्यायला लागतो जसे, 'अहमदनगरचा अनिल कपूर', 'शहापूरचा शाहरुख', 'नाशिकचा नागार्जून', 'बदलापूरचा बच्चन', 'मालेगावची माधुरी', तसाच हा आहे सातारचा सलमान!  

प्रियांका चोप्राच्या वादावर अभिनेता आयुष्मान म्हणतो...

'सातारचा सलमान' ही गोष्ट आहे एका छोट्या गावात राहणाऱ्या अमित काळभोर या सामान्य मुलाच्या स्वप्नांची आणि जिद्दीची. छोट्या गावात राहूनही मोठे स्वप्न पाहणारा अमित आपल्या सगळ्यांच्याच भेटीला येत आहे, 'सातारचा सलमान' या सिनेमातून. 'बघतोस काय मुजरा कर', 'ये रे ये रे पैसा २' अशा चित्रपटाचं दिग्दर्शन केलेला हेमंत ढोमे 'सातारचा सलमान' चित्रपटाचंही दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाची कथाही हेमंत ढोमे यांनीच लिहिली आहे.

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांना मदत करण्याचं कपिल शर्माचं आवाहन

 गर्लफ्रेंड, बसस्टॉप, आम्ही बेफिकर, शेंटिमेंटल, कृतांत यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेला सुयोग गोऱ्हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. सुयोग या सिनेमात अमित काळभोर ही  व्यक्तिरेखा साकारत असून अमितला त्याच्या गावाने 'साताऱ्याचा सलमान' ही हटके ओळख दिली आहे. अमितला ही ओळख का आणि कशी दिली या सर्व प्रश्नाची उत्तरं चित्रपटातून मिळणार आहेत. ‘सातारचा सलमान’ हा चित्रपट ११ ऑक्टोबर २०१९ रोजी  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.