पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : तांबड्या मातीतला रांगडा गडी 'केसरी'

केसरी

तांबड्या मातीतल्या रांगड्या गड्याची, एका पेहलवानाची गोष्ट सांगणाऱ्या 'केसरी' या आगामी मराठी चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. महाराष्ट्राच्या नसानसांत् कुस्ती भिनली आहे.

सलमानला भेटण्यासाठी तो ६०० किलोमीटर सायकल चालवत आला

कुस्तीच्या आखाड्यानं, या लाल मातीनं अनेक नावाजलेले पेहलवान महाराष्ट्राला दिले. अशाच एका पेहलवानाच्या जिद्दीची कथा 'केसरी'मध्ये पहायला मिळणार आहे. एका सर्वसामान्य घरातून आलेला मुलगा ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचे स्वप्न बघतो आणि स्वप्नपूर्तीसाठी वाट्टेल ती मेहनत करतो याचीच कथा 'केसरी'मध्ये पाहायला मिळणार आहे. 

पुण्यातील 'सविता भाभी'च्या पोस्टरमागे, अश्लील उद्योग मित्रमंडळ?

या चित्रपटात विराट मडके हा मुख्य भूमिकेत आहे. तो या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. याशिवाय महेश मांजरेकर, मोहन जोशी यांसारखे कलाकारदेखील या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजय डहाकेनं केलं असून २८ फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 

'प्रत्येक चित्रपटात तुझ्यासोबत रोमान्स करण्याची संधी मिळाली असती तर'