पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिरकणी : महाराजांनी गौरवलेल्या एका प्रेमळ आईची साहसकथा रुपेरी पडद्यावर

हिरकणी

महाराजांनी गौरवलेल्या एका प्रेमळ आईची साहसकथा लवकरच मराठी रसिकप्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आपल्या बाळासाठी जीव धोक्यात घालून रायगडाचा जीवघेणा कडा उतरणाऱ्या हिरकणीची कथा प्रसाद ओक घेऊन येत आहेत. 

फत्तेशिकस्त : स्वराज्याच्या शत्रूला नामोहरण करणारा 'सर्जिकल स्ट्राईक'

स्वराज्याच्या इतिहासात महाराजांनी या शूर आईला गौरवलं. जिच्या साहसाची कथा वाचून आपण लहानाचे मोठे झालो त्या मातेच्या साहसाचं दर्शन पुन्हा एकदा 'हिरकणी' चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांना होणार आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसाद ओक आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त राजेश मापुसकर पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

'आर. के. स्टुडिओ विकला, आता गणेशोत्सव नाही'

'आई भवानीचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवराय लढले वाघासारखे आणि राजांचे संस्कार घेऊन एक आई झाली बाळासाठी वाघीण, महाराजांनी गौरवलेल्या एका प्रेमळ आईची साहसकथा हिरकणी' असं ट्विट करत प्रसाद ओक यांनी चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर शेअर केलं आहे.  चित्रपटात कोणते कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत हे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. इरादा एंटरटेन्मेंटच्या फाल्गुनी पटेल यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. लॉरेन्स डिसुझा सहनिर्माते आहेत. तर राजेश मापुसकर यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून जबाबदारी निभावली आहे. या चित्रपटाची कथा अभिनेते चिन्मय मांडलेकरनं लिहिली आहे. हा चित्रपट  २४ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.