पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'गर्ल्स' मधल्या पहिल्या अभिनेत्रीचं नाव समोर

गर्ल्स

विशाल देवरुखकर यांचा  'गर्ल्स'  चित्रपट त्याच्या पहिल्या पोस्टरमुळे सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत राहिला. पोस्टरवर दिसणाऱ्या अभिनेत्री नेमक्या आहेत तरी कोण हे जाणून घेण्याचं कुतूहल प्रेक्षकांना होतं. अखेर या चित्रपटातील पहिल्या अभिनेत्रीचं  नाव समोर आलं आहे. या चित्रपटात विशाल देवरूखकरांनी तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. 'गर्ल्स' या चित्रपटातील तीन मुख्य अभिनेत्रींपैकीच एक म्हणजे 'मती' अर्थातच अंकिता लांडे होय.

... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं

अभिनय क्षेत्रात काम मिळावे एक नावाजलेली अभिनेत्री व्हावे असे स्वप्न बऱ्याच मुली बघतात आणि मुंबई नावाच्या मायानगरीत येतात. त्या सगळ्यापैकीच एक म्हणजे अंकिता लांडे. काम मिळवत असताना अंकिताने अनेक ऑडिशन्स दिल्या. योगायोग म्हणजे त्या वेळेस अंकिताने 'बॉईज २' साठी ऑडिशन दिली आणि तिची निवड देखील झाली. मात्र अभिनयातील अनेक बारकावे शिकून घेण्यासाठी 'बॉईज २' चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून तिनं कामं केलं.

अंकिता मांडे

'बॉईज २' चित्रपटाच्या वेळी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अंकिता या संपूर्ण टीमचा भाग होती. यावेळी तिने अभिनयासोबतच चित्रपटाशी संबंधित अनेक गोष्टी आत्मसात केल्या. अभिनयाच्या वर्कशॉप मध्येही ती सहभागी झाली. जेव्हा दिग्दर्शक विशाल देवरूखकरांनी 'गर्ल्स' चित्रपटाच्या कलाकारांची निवड आणि ऑडिशन सुरु केले तेव्हा, अंकिताने 'मती'या  भूमिकेसाठी ऑडिशन दिली आणि तिची निवड झाली. 
'चित्रपटाची पटकथा पूर्ण झाल्यानंतर 'गर्ल्स' या सिनेमासाठी कलाकारांचा शोध सुरू झाला. नवीन कलाकारांना संधी द्यायची या विचाराने नवीन मुलींसाठी आम्ही ऑडिशन्स सुरू केल्या. अनेक ऑडिशन्स झाल्या मात्र मला आणि माझ्या टीमला मनासारखी 'मती' मिळत नव्हती. सर्वात शेवटी अंकिताने ऑडिशन दिली आणि आम्हाला आमची 'मती' मिळाली.' अशी प्रतिक्रिया चित्रपटाचे दिग्दर्शक  देवरुखकर यांनी दिली. हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.