पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'वाजवुया बँड बाजा'ची टीम श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला

'वाजवुया बँड बाजा'

आगामी मराठी चित्रपट 'वाजवुया बँड बाजा'च्या संपूर्ण टीमनं पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत चित्रपटाच्या टीमनं 'वाजवुया बँड बाजा'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित केलं. २० मार्चला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 

दीपिकाच्या इमारतीत रणवीरनं घेतला भाडेतत्वावर फ्लॅट ?

विनोदाची उत्तम फोडणी असलेल्या या चित्रपटात मंगेश देसाई, चिन्मय उदगीरकर, समीर धर्माधिकारी आणि प्रितम कागणे प्रमुख भूमिकेत आहेत. शिवाजी पाटील या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. त्यांनी यापूर्वी  'भोंगा', 'धग' आणि 'हलाल' या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. 

अनुराधा पौडवाल यांच्यावर केरळच्या महिलेचा धक्कादायक आरोप

अमोल कागणे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. अमोल आणि शिवाजी यांनी यापूर्वी सामाजिक संदेश देणाऱ्या काही गंभीर चित्रपटांची निर्मिती केली आहे. मात्र  आता वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाची निर्मिती करण्याचं  आवाहन दोघांनी पेललं आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:upcoming marathi film Vajvuya Band Bajaa team pays visit to Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir