पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : 'पूर्वी- नील'चा दणक्यात साखरपुडा

मेकअप

गीताची धून... फुलांची सजावट... एकदंरच सगळ्यांची लगबग... आणि रंगीबेरंगी, आनंदी, उत्साही वातावरण. निमित्त होते पूर्वी आणि नीलच्या साखरपुड्याचे. पूर्वी आणि नीलचा साखरपुडा नुकताच दणक्यात पार पडला. या सोहळ्याला अनेक मान्यवरांसह मीडियाही उपस्थित होती. थोडे अचंबित झालात ना? कारणच तसे आहे. खरं तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात लग्नाच्या आधी येणारा हा खास क्षण. हा क्षण अधिकच अविस्मरणीय करण्यासाठी गणेश पंडित लिखित, दिग्दर्शित 'मेकअप' चित्रपटातील 'गाठी गं' हे गाणेही नुकतेच पूर्वी आणि नीलच्या साखरपुड्याच्या निमित्ताने धुमधडाक्यात लाँच करण्यात आले.

'गंगूबाई कोठेवाली' यांच्या भूमिकेतील आलियाचा पहिला लूक प्रदर्शित

साखरपुड्यावर आधारित असलेले हे गाणे उत्साहाने भरलेले आहे. यात नीलला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत आहे तर अनेक स्वप्ने उराशी बाळगून नव्या आयुष्याची सुरुवात होत असतानाच काळजात सुरु असलेली धाकधूक पूर्वीच्या चेहऱ्यावर दिसत आहे. या नाजूक क्षणातून जातानाच तिच्या चेहऱ्यावर लालीही पसरलेली आहे. नील -पूर्वीच्या साखरपुड्याचा आनंद सगळ्यांच्याच चेहऱ्यावर ओसंडून वाहत असल्याचा दिसतोय. नकळत आपल्या स्वतःच्या आयुष्याशी जोडता येणारे हे गाणे शाल्मली खोलगडे हिने गायले असून या गाण्याला ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे. तर गाण्याचे बोल वैभव देशमुख यांचे आहेत. या गाण्याला विठ्ठल पाटील यांचे नृत्य दिग्दर्शन लाभले आहे.

या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांच्याव्यतिरिक्त प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रणवीरच्या 'जयेशभाई जोरदार'मध्ये हा ज्येष्ठ अभिनेता वडिलांच्या भूमिकेत