पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जितेंद्र जोशीचा 'चोरीचा मामला', प्रियदर्शन करणार दिग्दर्शन

जितेंद्र जोशी

सध्या सोशल मीडियात चर्चा आहे ती आगामी 'चोरीचा मामला' या मराठी चित्रपटाची. मराठीतल्या अनेक कलाकारांची फौज या चित्रपटात पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे अभिनेता जितेंद्र जोशी एका अतरंगी भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहे. प्रियदर्शन जाधव यानं चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

...म्हणून दिल्लीत 'छपाक'चं प्रमोशन दीपिका- मेघनानं केलं रद्द

या चित्रपटातील जितेंद्र जोशी म्हणजेच जितूचा फर्स्ट लूक पोस्टरद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. जितूनं चित्रपटात नंदन व्यक्तिरेखा साकारली आहे. जितूसह अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांत दिसतील. या कलाकारांच्या नावावरुन टप्प्या टप्प्यानं पडदा उठणार आहे. 

प्रियदर्शननेच या चित्रपटाचं लेखनंही केलं आहे. "मस्का" या चित्रपटानंतर प्रियदर्शन जाधवचा दिग्दर्शक म्हणून चोरीचा मामला हा दुसरा चित्रपट आहे. हा चित्रपट ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

डॉ. अमोल कोल्हेंची महाघोषणा, तीन शिवकालीन चित्रपटाची करणार निर्मिती