उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला शनिवारी मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री जयप्रताप सिंह यांना कोरोनाची बाधा झाली नसल्याची पुष्टी झाली आहे. एवढेच नाही तर प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिच्या संपर्कातील 45 लोकांची कोरोना विषाणू संदर्भातील चाचणीत कोणतेही लक्षणं आढळलेली नाहीत.
कोरोनाविरोधातील शर्यत आपल्याला जिंकायची आहे: अक्षय कुमार
बसपाचे माजी खासदार अकबर अहमद डंपी यांच्या निवासस्थानी 14 मार्च रोजी त्यांचा भाचा आदिल अहमद यांच्या वाढदिवसा निमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये राज्याचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह त्यांच्या पत्नीसह उपस्थितीत होते. शुक्रवारी या पार्टीत सहभागी झालेल्या कनिकाला कोरोना विषाणुची लागण झाल्याची पुष्टी झाल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली होती.
कनिका सहभागी असलेल्या पार्टीत उपस्थिती लावल्यानंतर जय प्रताप सिंह यांनी अनेक मंत्र्यांच्या भेटी घेतल्या होत्या तसेच काही बैठकांना देखील हजेरी लावली होती. कनिका कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यानंतर तिच्या संपर्कात आल्यामुळे जयप्रताप सिंह आणि त्यांच्या पत्नी स्वत: क्वॉरंटाईन केले होते. याशिवाय संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेत त्यांची तपासणी करण्यात आली होती. आरोग्यमंत्र्यांसह सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
कोरोनामुळे दहावीचा अखेरचा पेपर लांबणीवर!
कनिका कपूरला कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती पसरताच लखनऊ, कानपूर आणि जयपूरमध्ये खळबळ उडाली होती. कनिका ज्या पार्टीमध्ये सहभागी झाली होती त्या पार्टीमध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, भाजप खासदार दुष्यंत सिंह आणि उत्तर प्रदेशचे मंत्री प्रताप सिंह सहभागी झाले होते. यासर्वांची तपासणी करण्यात आली होती.