पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'गंगूबाई काठीयावाडी' मध्ये DID मधल्या या डान्सरची वर्णी?

'गंगूबाई काठीयावाडी'

अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या 'गंगूबाई काठीयावाडी' या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. संजय लिला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२० ला प्रदर्शित होत आहे. आलिया भट्ट या चित्रपटात  'गंगूबाईं'ची भूमिका साकारत आहे. कामाठीपुरामधल्या देहविक्रेय करणाऱ्या  महिलांसाठी 'गंगूबाई' हे नाव देवदूतापेक्षा कमी नव्हतं.  देहविक्रेय करणाऱ्या  महिलांच्या वस्तीत त्या दंतकथा बनून राहिल्या. या चित्रपटात आलियाच्या विरुद्ध डान्स इंडिया डान्स मधला डान्सर शांतनू महेश्वरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. 

अक्षयवर चित्रपटांचा पाऊस, २०-२१ मध्ये प्रदर्शित होणार हे चित्रपट

संजय लीला भन्साळी हे नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे. शांतनूनं या चित्रपटासाठी ऑडिशनदेखील दिली आहे. शांतनूचा अभिनय 'गंगूबाई काठीयावाडी' च्या टीमला पसंत पडला आहे. तो या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याची माहिती पिंकव्हिला या संकेतस्थळानं दिली आहे. सध्या मुंबईत या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे.  

रणवीरच्या 'जयेशभाई जोरदार'मध्ये ही अभिनेत्री आईच्या भूमिकेत

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Never give up on anything that makes you smile

A post shared by Shantanu Maheshwari (@shantanu.maheshwari) on

कोण आहेत गंगूबाई
पत्रकार हुसैन झैदी यांनी लिहिलेल्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई'  या कांदबरीत  गंगूबाई यांच्याविषयी लिहलं गेलं आहे. नवऱ्यानं फसवून त्यांना देहविक्रेय करणाऱ्या महिलेला विकलं होतं. सधन  कुटुंबातून आलेल्या गंगूबाईचं कमी वयात आयुष्य उद्धवस्त झालं.  गंगूबाईंच्या परतीचे दरवाजे बंद झाले. देहविक्रेय करायला नशीबानं भाग पाडलं असलं तरी  पुढे  याच गंगूबाई देहविक्रेय करणाऱ्या महिलांसाठी आशेच्या किरण ठरल्या होत्या. मनाविरुद्ध या व्यवसायात ओढल्या गेलेल्या मुलींची सुटका करून त्यांना गंगूबाई घरी पाठवून दयायच्या. 

गणेश आचार्य नवोदितांचा गैरफायदा घेतो, तनुश्रीचा आरोप