पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रियांकाला सदिच्छा दूत पदावरून हटवण्याची पाकची मागणी युनिसेफनं फेटाळली

प्रियांका चोप्रा

अभिनेत्री प्रियांका चोप्राला युनिसेफच्या सदिच्छा दूत पदावरून हटवण्याची पाकिस्तानी मंत्र्यांची मागणी युनिसेफनं फेटाळून लावली आहे.  प्रियांकाच्या वादावर युनिसेफच्या प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. प्रियांकाचे विचार हे वैयक्तिक आहेत. ज्या विषयासंबधी तिला चिंतेनं ग्रासलं आहे त्या विषयावर मत मांडण्याचा हक्क तिला आहे, असं युनिसेफनं म्हटलं आहे.

प्रियांका चोप्राच्या वादावर अभिनेता आयुष्मान म्हणतो...

काय आहे वाद?
काही दिवसांपूर्वी लॉस एंजलिसमध्ये ब्युटीकॉन कार्यक्रमात  प्रमुख पाहुणी म्हणून प्रियांकानं उपस्थिती लावली होती. यावेळी प्रियांका ही संयुक्त राष्ट्रांची सदिच्छा दूत असताना पाकिस्तानविरोधात आण्विक युद्धाला तिनं प्रोत्साहन दिलं असा आरोप उपस्थित पाकिस्तानी तरुणीनं केला. पाकिस्तानातील अनेक लोकांनी तुला पाठिंबा दिला, मात्र तू जय हिंद असं ट्विट करून पाकिस्तानविरोधात आण्विक युद्धाला समर्थन दिलं असं या तरुणीनं म्हटलं. तिच्या आरोपांवर प्रियांकानं संयमानं उत्तर दिलं होतं. 'मला स्वतःला युद्ध व्हावं असं वाटत नाही. मात्र मी एक देशभक्त सुद्धा आहे. माझ्या त्या ट्विटमुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील मी त्यांची माफी मागते, माझ्या मते सर्वांसाठी एक मध्यम मार्ग असतो त्या मार्गावरून अनेकजण चालत असतात. ओरडून या प्रश्नावर मार्ग निघणार नाही, आपण इथे प्रेम भावनेनं एकत्र आलो आहोत', असं प्रियांका म्हणाली. 

'नेटफ्लिक्स'च्या सुपरहिरो चित्रपटात प्रियांकाची वर्णी

काय होतं ट्विट 
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं सर्जिकल स्ट्राइक करत या हल्ल्याचा सूड घेतला त्यानंतर प्रियांकासह अनेक कलाकारांनी ट्विट करत भारतीय सैन्याचं कौतुक केलं. प्रियांकानं या सर्जिकल स्ट्राइकनंतर 'जय हिंद' असं ट्विट केलं. यावरून संबधित पाकिस्तानी तरुणीनं तिला आण्विक युद्धाला समर्थन  दिल्याचा आरोप केला. 

प्रियांकाला सदिच्छा दूत पदावरून हटवण्यासाठी पाकचा हस्तक्षेप
पाकिस्तानातील मानवी हक्क  विभागाच्या  मंत्री शिरीन मझारी यांनी युनिसेफला पत्र लिहून प्रियांका चोप्राला ‘सदिच्छा दूत’ या पदावरुन हटवण्याची  मागणी केली. प्रियांकाचा युद्धाला पाठिंबा आहे त्यातून तिचं आण्विक युद्धाला समर्थन  आहे. तिला सदिच्छा दूत पदावरून हटवावं अन्यथा या पदाचं हसं होईन अशा आशयाचं पत्र शिरीन मझारी यांनी लिहिलं युनिसेफची 'सदिच्छा दूत' या नात्याने प्रियांका चोप्राने शांततेचा पुरस्कार केला पाहिजे. पण तिची भूमिका या तत्वांच्या पूर्णपणे विरोधात आहे. प्रियांका ही भारत सरकारचा प्रचार करत आहे. भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी पाकिस्तानला आण्विक युद्धाची धमकी दिली आहे, असं या पत्रात लिहिलं होतं. 

अभिनेता आदित्य रॉय कपूर या मॉडेलला डेट करत असल्याच्या चर्चा

युनिसेफनं फेटाळली मागणी 
या वादावर युनिसेफच्या प्रवक्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  युनिसेफच्या सदिच्छा दूताला त्याची अभिरुची असणाऱ्या किंवा त्याला चिंतेत टाकणाऱ्या विषयावर  मत मांडण्यांचा अधिकार आहे. ही मतं  पूर्णपणे वैयक्तिक आहेत. ही मतं युनिसेफची नाहीत. मात्र जेव्हा ते युनिसेफच्या वतीनं आपलं  मत मांडतात त्यावेळी  ही मतं युनिसेफच्या मुल्यांचा आणि भूमिकेचा आदर करणारीच असायला हवीत, असं युनिसेफच्या प्रवक्यांनी म्हटलं आहे.