पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'उडता पंजाब'साठी दिलजित ऐवजी या सुपरस्टारला होती पहिली पसंती

दिलजित दोसांज

शाहिद कपूर, दिलजित दोसांज, करिना कपूर  आणि आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला 'उडता पंजाब' चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. अनेक कारणांमुळे हा चित्रपट मोठ्या वादात सापडला. मात्र तरीही  प्रेक्षक आणि समिक्षकांची चांगली पसंती या चित्रपटाला मिळाली. पंजाबी अभिनेता दिलजित दोसांज यानं या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र दिलजित दोसांज ही चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हती. 

स्मृतिदिन विशेष : '....जगण्याचं टायमिंग मात्र थोडंस चुकलं'

'उडता पंजाब' मधील पोलिसांच्या भूमिकेसाठी आधी राष्ट्रीय पुरस्कार विजेता आयुष्मान खुरानाला विचारण्यात आलं होतं. मात्र आयुष्यामान त्याच्या इतर चित्रपटामध्ये व्यग्र होता. त्याला  चित्रपटासाठी तारखा देता आल्या नाहीत. त्यामुळे हा चित्रपट दिलजित दोसांजकडे गेला.

एका मुलाखतीत आयुष्माननं याबद्दल सांगितलं होतं. मला अनेक कलाकार असलेल्या चित्रपटात काम करण्यास काहीच हरकत नव्हती मात्र त्यावेळी इतर चित्रपटांसाठी मी काम करत होतो. माझ्या तारखा जुळत नव्हता. एके दिवशी दिग्दर्शकांनीच माझ्या ऐवजी दुसऱ्या अभिनेत्याची निवड केल्याचं सांगितलं, मी त्यावेळी खूपच दु:खी झालो होतो असंही आयुष्माननं सांगितलं. नशेच्या आहारी गेलेल्या पंजाबमधील तरुणांच्या अवतीभोवती  या चित्रपटाची कथा फिरते. 

'तेव्हा लोकांना माझा विद्रुप चेहरा पहायचा नव्हता आणि आता.....'