पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कपिल प्रत्येक एपिसोडसाठी घेतो इतके मानधन, उदित नारायण यांची पोलखोल

दी कपिल शर्मा शो

कॉमेडीयन कपिल शर्मा आपल्या कॉमेडी शोमुळे खूपच लोकप्रिय झाला आहे. विनोदाच्या उत्तम टायमिंगसाठी कपिल ओळखला जातो. त्याच्या शोमध्ये आलेल्या पाहुण्यांची फिरकी घेण्यासाठी कपिल प्रसिद्ध आहे. 

मराठी चित्रपट ‘बाबा’चे लॉस एंजलिस येथे ‘गोल्डन ग्लोब्ज’मध्ये प्रदर्शन

मात्र अशा या कपिलची गायक उदित नारायण यांनी चांगलीच फिरकी घेतली.  कार्यक्रमात कपिलच्या मानधनाची पोलखोल उदित यांनी केली. कपिल शर्मा प्रत्येक एपिसोडसाठी जवळपास १ कोटींचं मानधन घेतो हे माझ्या ऐकण्यात आलंय असं उदित नारायण म्हणाले. विशेष म्हणजे कपिलनं ही गोष्ट नाकारली नाही. यापूर्वी अनेकदा सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार म्हणून अक्षय कुमारसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी कपिलची फिरकी घेतली आहे 

कपिल होणार बाबा, 'बेबी शॉवर'चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

'कॉमेडी नाइट्स विथ कपिल शर्मा'च्या सुपरहिट यशानंतर  कपिलचा 'द कपिल शर्मा शो' आला. टीआरपीच्या यादीत अव्वल असलेल्या या शोचे भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. ही लोकप्रियता पाहता कपिल शर्मा हा  सर्वाधिक मानधान आकारणारा छोट्या पडद्यावरील कलाकार आहे असं म्हटलं जातं.