पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून कटप्पानं 'बाहुबली'ला मारलं, 'साहो'वर भन्नाट मीम्स

साहोवर मीम्स व्हायरल

कधी कधी दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं असं म्हटलं जातं. प्रभास- श्रद्धाच्या 'साहो' बाबतही असंच काहीसं झालं आहे. बिग बजेट, व्हिएफएक्स, श्वास रोखून धरणारे अॅक्शन सीन्स आणि तगडी स्टारकास्ट सर्वकाही या चित्रपटात आहे त्यामुळे प्रेक्षक 'साहो' पाहण्यास कमालीचे उत्सुक होते. मात्र या चित्रपटाला प्रभावी कथाच नाही असं समीक्षकांसह प्रेक्षकांचंही म्हणणं होतं. त्यामुळे हा चित्रपट फसला.

बहीण म्हणते, टायगर १०० % सिंगल

या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रभाससारखं मोठं नाव या चित्रपटाशी जोडलं गेलं. 'बाहुबली' आणि 'बाहुबली २' मुळे केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात प्रभासचा मोठा चाहतावर्ग तयार झाला.  मात्र प्रेक्षकांच्या अपेक्षाभंग करणारा हा चित्रपट ठरला. 

'गेम ऑफ थ्रोन्स'मधल्या 'डेनेरेस तारगारयेन'ची भारतभ्रमंती

प्रेक्षकांनी या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. प्रभासनं वाईट चित्रपट भविष्यात करू नये म्हणूनच कटप्पानं बाहुबलीला मारलं अशाप्रकारचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.