पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रानू यांच्या मेकओव्हरचं अनेक नेटकऱ्यांकडून समर्थन

रानू मंडल ट्रोल

सुरेल आवाजामुळे रातोरात प्रसिद्ध झालेल्या रानू मंडल यांचा मेकओव्हर पाहून अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. चेहऱ्यावर भडक मेकअप करुन तयार झालेल्या रानू मंडल यांची अनेकांची खिल्ली उडवली. रानू यांचा मेकअपमधला फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर काही ट्विटर युजर्सनं नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. 

तान्हाजी मालुसरेंच्या साहसाचा आधारस्तंभ सावित्रीबाईंच्या भूमिकेत काजोल

मात्र अनेक महिला ट्विटर युजर्स रानू यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. हा मेकअप त्यांनी स्वत:हून केला नाही यात त्यांचा काय दोष असा प्रश्न अनेकांनी ट्रोलर्सनां विचारला आहे. 

रानू कठीण परिस्थितीवर मात करत पुढे आल्या आहेत कोणी दुसऱ्यांनी त्यांचा मेकओव्हर केला म्हणून त्यासाठी रानू यांना जबाबदार धरणं चुकीचं आहे असंही एका ट्विटर युजर्सनं म्हणलं आहे. 

झुंड : बच्चन यांना नोटीस, तर नागराज मंजुळेंवर गंभीर आरोप

राणाघाट रेल्वे स्थानकावर गाणं गाऊन रानू या उदरनिर्वाह करायचा. लतादींदींचं 'एक प्यार का नगमा है'  गाणं गातानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओनं त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली होती.