पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अवतार' नाकारणाऱ्या गोविंदाची सोशल मीडियावर खिल्ली

गोविंदा

'अवतार' चित्रपटातील एका भूमिकेसाठी मला ऑफर आली होती मात्र मी ती नम्रपणे नाकारली असं म्हणणारा गोविंदा आता सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. या चित्रपटासाठी 'अवतार'  हे नाव प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांना मीच सुचवलं होतं, असाही दावा गोविंदानं केला होता. 'आप की अदालत' या कार्यक्रमात गोविंदानं हा खुलासा केला होता. त्यानंतर गोविंदा अल्पावधितच सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला. 

दीपिका, रणबीरसह करणच्या पार्टीतील सर्व कलाकार नशेत, आमदाराचा आरोप

ही मुलाखत व्हायरल झाल्यानंतर त्याची नेटकऱ्यांनी चांगलीच फिरकी  घेतली. 'अवतार'मध्ये भूमिका देऊ केली या गोविंदाच्या दाव्यावर अनेकजण विश्वास ठेवायला तयार नाहीत.

सनीचा मोबाइल नंबर समजून दिल्लीस्थित तरुणाला फोन करून केलं हैराण

काय म्हणाला होता गोविंदा 
जेम्स कॅमेरून यांनी या चित्रपटातील एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी मला विचारलं होतं. मात्र मी ४१० दिवस चित्रीकरण करणं अपेक्षित होतं. कथेच्या गरजेनुसार संपूर्ण शरीरास बॉडी पेंटही लावण्यात येणार होता. मला बॉडी पेंट लावून इतके दिवस वावरणं मान्य नव्हतं. त्यामुळे मी अत्यंत नम्रपणे नकार कळवला. हा चित्रपट नक्कीच सुपरहिट होईन यासाठी मी कॅमेरून यांना शुभेच्छाही दिल्या. इतकंच नाही तर मी चित्रपटासाठी 'अवतार'हे नाव देखील सुचवलं होतं असंही गोविंदानं सांगितलं. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Twitter came up with a tonne of memes after Govinda claims he was offered James Cameron Avatar