पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईच्या पावसाचा अक्षय, ट्विंकलला असा बसला फटका...

ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार

रविवारपासून दमदार बरसण्यास सुरुवात केलेल्या पावसाने मुंबईतील अनेकांचे प्लॅन्स उधळून लावले आहेत. अनेकांना ठरविलेली कामे पूर्ण करता आलेली नाहीत. सोमवारी रात्री पडलेल्या पावसामुळे तर काही जणांना मंगळवारी घरातून बाहेरही पडता आलेली नाही. असा फटका अभिनेता अक्षय कुमार, त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांनाही बसला. सुटीसाठी लंडनला जाण्याचा बेत त्यांना सोमवारी रद्द करावा लागला. खुद्द ट्विंकलनेच तिच्या ट्विटर हँडलवरून याबद्दल माहिती दिली.

मुंबईच्या विमानतळावर अक्षय, ट्विंकल आणि त्यांची मुलगी नितारा हे सगळे सोमवारी रात्री कॅमेऱ्यात कैद झाले होते. सुटीसाठी हे सर्व कुटुंब लंडनला निघाले होते. अक्षयने निताराला त्याच्या कडेवर घेतले होते. पण मुंबईत सोमवारी रात्री पडत असलेला तुफान पाऊस, स्पाईसजेटचे विमान धावपट्टीवरून घसरल्याची घडलेली घटना यामुळे त्यांना आपला बेत रद्द करावा लागला. लंडनमध्ये सुटीचा बेत रद्द करावा लागल्याचे ट्विंकल खन्नाने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.

अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होतो आहे. या सिनेमाचे शूटिंग सध्या सुरू आहे. या शूटिंगचा एक व्हिडिओ त्याने सोमवारी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता. यामध्ये अक्षय कुमारचे काही स्टंट चित्रित होताना पाहायला मिळतात.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Twinkle Khanna tweets we sailed back home amid heavy Mumbai rains after shes spotted with Akshay Kumar at airport