पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राणादाचा कुस्तीला तात्पुरता रामराम, झाला पोलिसांत भरती

राणादाचा कुस्तीला तात्पुरता रामराम

कुस्तीवर जीवापाड प्रेम करणारा मातीतला रांगडा गडी राणादा  पोलिसांत भरती होणार  आहे.  झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेला आता वेगळं वळण लाभणार आहे. आता प्रेक्षकांना  त्यांचा लाडका राणा पोलिसांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

दीपिका पादुकोन साकारणार द्रौपदी

राणा नोकरी किंवा व्यवसाय करुन उदरनिर्वाह करायचं ठरवणार आहे. अंजली देखील त्याच्या या निर्णयात त्याला साथ देणार आहे. राणा त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याचं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार करतो आणि नोकरीच्या शोधात असलेल्या राणाला स्पोर्ट्स कोट्यातून पोलिस भरतीची माहिती कळते. राणा तिथे भरती होऊन ट्रेनिंग घेणार आहे. 

'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'

प्रेक्षकही राणाला या नव्या वेषात पाहण्यास उत्सुक आहेत. राणाची भूमिका साकारत असलेला हार्दिकदेखील ही भूमिका साकारण्यासाठी खूपच उत्सुक आहे.