पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तुझ्यात जीव रंगला :सेटवर पूजा करून केला १००० भागांच्या यशाचा आनंद

तुझ्यात जीव रंगला

झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेनं सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या मालिकेनं नुकताच १ हजार भागांचा यशस्वी टप्पा पार केला. हजार भागांचं सेलिब्रेशन नेहमीसारखं न करता अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आनंद साजरा करण्यात आला. हा आनंद साजरा करताना मालिकेच्या संपूर्ण टीमनं सेटवर पूजा केली.

अनेकदा मालिकांच्या सेटवर केक कापून सेलिब्रेशन केलं जातं. मात्र 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या संपूर्ण टिमचं सेटवर पूजा करून  १०० भागांचा  आनंद साजरा केला. 

अभिनेत्री उषा जाधवनं मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार

"प्रेक्षकांच्या अखंड प्रेमामुळे तुझ्यात जीव रंगला या मालिकेने १००० भाग पूर्ण केले. यामध्ये या वास्तूचा देखील खूप मोठा हात आहे. या वास्तूने आम्हाला साडे तीन वर्ष साथ दिली. त्यामुळे या वास्तूचे आभार मानून नवीन एपिसोडची सुरुवात करण्यासाठी आम्ही पूजेचा घाट घातला. रसिक प्रेक्षकांनी आमच्यावर केलेल्या प्रेमासाठी आणि त्यांनी इथंवर दिलेल्या साथीसाठी मी त्यांचे आभार मानते.", अशा भावना पाठकबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधरनं व्यक्त केल्या. 

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींना त्वरीत फाशी द्याः चिरंजीवी

 "दरवेळी केक कापून किंवा पार्टी करून हा आनंद साजरा करण्यात येतो पण यावेळी आमच्या संपूर्ण टीमने असा निर्णय घेतला कि जिथे आपण शूट करतो तिथे सकारात्मक वातावरण बनवण्यासाठी आपण एक छानशी पूजा आणि होम करून हा आनंद साजरा करूया. म्हणून ही पूजा आम्ही सेटवर केली. १००० भाग पूर्ण केल्याचं सगळं श्रेय मी प्रेक्षकांना देतो, ज्यांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं." असं   राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी म्हणाला. या मालिकेच्या कथानकाने नुकतीच ५ वर्षांची आघाडी घेतली.