पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अक्षय, सलमानच्या चित्रपटालाही टाकलं हृतिक- टायगरच्या 'वॉर'नं मागं

वॉर

'वॉर' चित्रपटाच्या निमित्तानं हृतिक- टायगर ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र काम करत आहे. २ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेला हृतिक- टायगरचा 'वॉर' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटानं  आता अक्षयच्या 'मिशन मंगल' आणि सलमानच्या 'भारत' चित्रपटालाही मागे टाकलं आहे. 'वॉर' हा २०१९ मधला आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 

'सिनियर सिटीझन'मध्ये मराठीतले हे ज्येष्ठ अभिनेते मुख्य भूमिकेत

शाहिद कपूर -किआरा अडवाणीच्या 'कबीर सिंह'ला मागे टाकत कमाईच्या बाबतीत 'वॉर' नं पहिलं स्थान पटकावलं आहे. वॉरनं  आतापर्यंत २८० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत 'कबीर सिंह' दुसऱ्या स्थानी आहे या चित्रपटाची एकूण कमाई २७८ कोटी आहे. विकी कौशलचा 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' तिसऱ्या स्थानी आहे या चित्रपटानं २४५ कोटी कमावले होते.

आलिया भट्ट 'गंगूबाई कोठेवाली' यांच्या भूमिकेत

चौथ्या स्थानी सलमान- कतरिनाचा 'भारत' चित्रपट आहे. या चित्रपटानं २१६ कोटींची कमाई केली. तर कमाईच्या बाबतीत पाचव्या स्थानी अक्षयचा 'मिशन मंगल' चित्रपट असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे. या चित्रपटाची एकूण कमाई ही २०२ कोटींची आहे.