पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या शाळेत विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी मिळतो ब्रेक

(छाया सौजन्य : एएनआय)

जल हे जीवन आहे, जल अमृत आहे. रोज भरपूर पाणी प्यावं असं सांगतात. भरपूर पाणी प्यायल्यानं आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. मुलांच्या शरीरात पाण्याची पातळीही योग्य राहावी यासाठी कर्नाटकमधील एका शाळेनं तीन वेळा पाण्यासाठी मुलांना ब्रेक दिला आहे. 

आयएनएक्स मीडिया प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून ईडीला नोटीस

कर्नाटकमधील इंद्रप्रस्थ शाळेनं नवीन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमानुसार शाळेच्या वेळेत तीन वेळा घंटा वाजवली जाते. याद्वारे मुलांना पाणी पिण्याची आठवण करून दिली जाते. आपले शरीर हे ६० ते ७० % पाण्यानं बनलं आहे. मुलं योग्य पाणी प्राशन करतील  हे पाहण्याची जबाबदारी  आपल्या सर्वांची आहे. पिण्यासाठी स्वच्छ पाणी ही यावर्षांची युएनची संकल्पना आहे, आणि याच संकल्पनेवरून आम्ही मुलांना पाणी पिण्यासाठी ब्रेक देण्याचं ठरवलं आहे, अशी प्रतिक्रिया या शाळेचे मुख्याधापक एमजे जोसे यांनी दिली.

दिवसातून तीन वेळा म्हणजे सकाळी १०.४५, दुपारी  १२ आणि २ वाजता मुलांना  पाणी पिण्याची आठवण करून दिली जाते. 

गॅस गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट; आई, मुलगा आणि वडिलांचा मृत्यू