पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शूजमुळे पायाला येणारी दुर्गंधी घालवण्याच्या सोप्या टीप्स

प्रातिनिधिक छायाचित्र

बंद शूजमुळे अनेकदा पायाला दुर्गंधी येते. ऑफिस किंवा बाहेर जाताना तासन् तास पायात शूज असतात, त्यामुळे पायाला घाम येतो आणि पायाला दुर्गंधी येते. बऱ्याचदा पाय धुवूनही घामाची दुर्गंधी जात नाही. त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणून या टीप्स नक्की  ट्राय करा. 

 

हे पाच पदार्थ त्वचेला देतील नैसर्गिक उजळपणा

- पाय अँटी बॅक्टेरिअल साबणानं  नियमीत धुवा, अनेकदा बोटांमध्ये घामामुळे किटाणू राहतात त्यामुळे पायाला दुर्गंधी येते. 
- शूजमध्ये सॉक्स तसेच ठेवून नका, यामुळे शूजमध्ये सुद्धा दुर्गंधी तशीच राहते.
- शूजमधली दुर्गंधी घालवण्यासाठी त्यात टी बॅग ठेवा. टी बॅग काही प्रमाणात दुर्गंधी शोषून घेण्याचं काम करते,
-  शूज घालण्यापूर्वी नेहमी पाय कोरडे करून त्यांना फूट पावडर लावा. 

Beauty Tips : नारळाचं दूध केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर
- शक्य असल्यास मध्ये मध्ये शूजमधून पाय बाहेर काढा. 
- दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही लव्हेंडर तेलही वापरू शकता. कोमट पाण्यात लव्हेंडर तेलाचे काही थेंब टाका त्यात पाय काही काळ बुडवून ठेवा. दिवसातून एकदा हे नक्की करा.