पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेत्रीला थकलेल्या मानधनाचे ३० लाख देण्यास निर्मात्याचा नकार

टीना दत्ता

टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना काम सुरू झाल्यानंतर ९० दिवसांनी मानधन मिळतं. गेली कित्येक वर्षे छोट्या पडद्यावर अशाच प्रकारे मानधनाचं गणित सुरू आहे. मात्र याचा फटका पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या अभिनेत्रीला बसला आहे.  निर्मात्यांनी थकलेले ३० लाख देण्यास नकार दिल्याचा आरोप  अभिनेत्री टीना दत्तानं हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना केला आहे. 

रानू मंडल यांचं महिला चाहतीसोबत गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल

 मला निर्मात्याचं नाव घ्यायचं नाही. मात्र कार्यक्रम बंद झाल्यानंतर  ३० लाखांचं माझं मानधन देण्यास त्यानं नकार दिला आहे. मोठं नुकसान सहन करावं लागत असतानाही मी कार्यक्रम सुरू ठेवला असा दावा त्यानं केला आहे. पण मला त्यात तथ्य वाटत नाही कारण मालिकेस चांगले  प्रायोजक आणि जाहिरातीही मिळत होत्या, असं टीनाचं म्हणणं आहे.

मी विविध ठिकाणी पैसे गुंतवले आहेत. मालिका बंद झाली तरी तीन महिन्यांनंतर मला माझे मानधन मिळेल अशी खात्री होती. मात्र आता निर्मात्यांनी मला पैसे देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मी मोठ्या अडचणीत सापडली आहे, मला धक्का बसला असून आता या परिस्थितीतून मार्ग कसा काढावा हेच मला समजत नसल्याचं टीनानं सांगितलं. 

..म्हणून आजतागायत रविनानं पाहिला नाही 'अंदाज अपना अपना'

यासंदर्भात तिनं सिंटाकडे लेखी तक्रारही केली आहे. एखादी मालिका चालली नाही किंवा निर्मात्यांना तोटा झाल्यास त्यांनी मानधनातील रक्कम कमी करुन द्यावी किंवा मानधनाबाबत कलाकारांना स्पष्टता द्यावी. करार करताना त्यात या गोष्टी नमूद कराव्यात. मात्र कलाकारांना कोणत्याही प्रकारची कल्पना दिली जात नाही हे जास्त त्रासदायक असल्याचं टीनानं म्हटलं आहे.