पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टायगरनं घेतलं ८ बेडरुम्सचं आलिशान घर

टायगर श्रॉफ

अभिनेता टायगर श्रॉफनं ८ खोल्यांचं आलिशान घर घेतलं आहे. टायगर आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत एप्रिल महिन्यात खारमधील या आलिशान घरात राहायला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

टायगरची आई आयेशा श्रॉफ हे घर सजवण्यासाठी त्याला मदत करत असल्याचंही स्पॉटबॉय इनं म्हटलं आहे. 'गेल्या काही महिन्यांपासून टायगर नव्या घराच्या शोधात होता. या महिन्याच्या सुरूवातीला त्याला मनासारखं घर सापडलं. अभिनेता जॉन अब्राहमचा भाऊ अलान यांच्याकडे या घराच्या इंटिरिअरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

आयुष्मानचा भाव वधारला, मिळाल्या पूर्वीपेक्षा चौपट जाहिराती

टायगरला जॉनचं घर आवडलं होतं, अलाननं या घराची सजावट केली होती त्यामुळे नव्या घराच्या  इंटिरिअरची जबाबदारी टायगरवर सोपवण्यात आली आहे. या घराचा एक कोपरा टायगरनं  त्याच्या जिमसाठी राखून ठेवला आहे. टागरला फिटनेसची खूपच आवड आहे त्यामुळे घरात त्याच्यासाठी जिमही उभारण्यात येणार आहे., अशी माहिती टायगरच्या जवळच्या सुत्रांनी मुंबई मिररशी बोलताना दिली. 

मस्तानीबाईंविषयीच्या त्या संवादावर बाजीराव पेशव्यांच्या वंशजाचा आक्षेप

टायगरचा हृतिकसोबत काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला 'वॉर' चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटानं  ३०० कोटींचा गल्ला जमवला होता.