पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#ThrowbackThursday : हृतिकसोबत दिसणाऱ्या या स्टारकिड्सनां ओळखलंत का?

हृतिक रोशन आलिया भट्ट

दर आठवड्याला  गुरूवार आला  की सोशल मीडियावर #ThrowbackThursday हा  हॅशटॅग ट्रेंड करू लागतो. तर सध्या सोशल मीडियावर हृतिकसोबत दिसणाऱ्या स्टारकिड्सचा एक फोटो चांगलाच ट्रेंड होऊ लागला आहे. हा फोटो निर्माती अनु रंजन हिनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ते सर्वच खूपच गोंडस दिसत आहेत असं लिहित अनू यांनी तो फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

यात हृतिक सोडला तर अन्य स्टारकिड्स अनेक चाहत्यांना ओळखूही आले नाहीत. या फोटोमध्ये हृतिकसोबत आलिया भट्ट आणि तिची बहिण शहिन भट्ट या दोघीही आहेत. याव्यतिरिक्त फॅशन डिझायनर मासबा गुप्ता देखील हृतिकच्या शेजारी उभी आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

These are the most adorable ones ,without realising 💞💞

A post shared by Anu Ranjan (@anuranjan1010) on

हा फोटो खूप जूना असला तरी वयाची चाळीशी उलटलेला हृतिक तेव्हाही आणि आताही तितकाच तरूण दिसत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी या फोटोवर दिल्या आहेत.