पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून 'बधाई हो'च्या सीक्वलमध्ये दिसणार नाही आयुष्मान खुराना

बधाई हो

आयुष्मान खुराना, सान्या मल्होत्रा, निना गुप्ता यांची प्रमुख भूमिका असलेला  'बधाई हो' २०१८ सालच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक  ठरला होता.  आयुष्मानचा सुपरडुपर हिट ठरलेल्या या चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा करण्यात आली. या सीक्वलमध्ये आयुष्मान सान्या नाही तर भूमी पेडणेकर - राजकुमार रावची जोडी पाहायला मिळणार आहे. खरं तर यात आयुष्मान का नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला होता, याचं कारण आता समोर आलं आहे. 

PHOTOS : दीपिकाचे हे फोटो पाहून रणवीरही म्हणतो 'दया कर'

'बधाई हो' चित्रपटाच्या मालिका काढण्याचा विचार निर्मात्यांचा आहे. त्यामुळे प्रत्येक चित्रपटात नव्या चेहऱ्याला किंवा जोडीला प्राधान्य दिलं जाईल हे पूर्वीच ठरलं होतं त्यामुळे या महत्त्वाच्या कारणामुळे 'बधाई हो २' मध्ये आयुष्यमान- सान्या ऐवजी राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरला संधी देण्यात आली आहे. तसेच यात भूमी आणि राजकुमार दोघंही समलैंगिकाची भूमिका साकारणार आहे. आयुष्माननं शुभ मंगल ज्यादा सावधानमध्ये समलैंगिक व्यक्तीची भूमिका साकारली आहे, त्यामुळेदेखील आयुष्मानला संधी देण्यात आलेली नाही.

Video : स्वप्नीलच्या 'समांतर' प्रवासाची चित्तथरारक कथा

राजकुमार राव- भूमी पेडणेकर

भूमी या चित्रपटात शिक्षिकेच्या भूमिकेत आहे तर राजकुमार महिला पोलिस ठाण्यात असलेल्या एकमेव पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं  भूमी आणि राजकुमार पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. जून महिन्यात 'बधाई हो २ 'च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे तर २०२१ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

त्यांनी आमच्यावर अंडी फेकली, दीपिकानं सांगितली मुंबईतल्या होळीची आठवण