पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागरिकत्त्वाच्या मुद्द्यावरून हे चार सेलिब्रिटी सापडले होते वादात

दीपिका पादुकोन

लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत बॉलिवूड कलाकारांनी मतदान  केलं.  मतदानाविषयी  जनजागृती करण्यात अनेक कलाकारांचा मोठा वाटा होता. मोदींनी  निवडणुकांपूर्वी  बॉलिवूड कलाकारांना मतदानाविषयी जनजागृती करण्याचं आवाहन केलं होतं. सलमान खान, रणवीर सिंगसह अनेक अभिनेत्यांनी मतदानाविषयी जनजागृती केली.  मात्र निवडणुकांत मतदान न करणारे काही कलाकार  नागरिकत्त्वाच्या मुद्द्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडले  होते  हे कलाकार कोणते ते पाहू.

 १ अक्षय कुमार
अक्षय कुमारनं काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली होती. मात्र मोदींची मुलाखत घेणारा अक्षय मतदानाच्या दिवशी कुठेच दिसला नाही. यानंतर मतदान न करणाऱ्या अक्षयला अनेकांनी प्रश्नही विचारले. अखेर अक्षयनं आपण कॅनेडियन पासपोर्ट धारक असल्याचं मान्य केलं.  माझ्या नागरिकत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून  नवा  वाद निर्माण केला जात आहे असं म्हणत अक्षयनं नाराजी वर्तवली होती.

२. दीपिका पादुकोन 
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोन हिच्या नागरिकत्त्वावरूनही मोठा वाद झाला होता. ती डॅनिश पासपोर्ट धारक आहे असं म्हटलं जातं होतं मात्र मतदान केल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून दीपिकानं  तिच्या नागरिकत्त्वावर  सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. दीपिकाचा जन्म हा डेन्मार्कमध्ये झाला होता. 

३. आलिया भट्ट 
आलिया भट्ट देखील ब्रिटीश पासपोर्ट धारक आहे. लोकसभा निवडणुकाआधी आलियानं एका मुलाखतीत हे मान्य केलं होतं. याच मुद्द्यावरून कंगनानं  आलियावर जोरदार टिका केली होती.

४. सोनी राझदान
आलियाची आई सोनी राझदान या देखील नागरिकत्त्वाच्या मुद्द्यावरून वादात सापडल्या. मी ब्रिटीश नागरिक असले  तरी माझे वडील हे भारतीय आहे. मी तीन महिन्यांची असल्यापासून भारतात राहत आहे.

देशाच्या विकासासाठी  करही भरत आहे.  मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे असं त्या म्हणाल्या होत्या.