पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'दी स्काय इज पिंक'ची पहिल्या दिवशी अत्यल्प कमाई

'दी स्काय इज पिंक'

बॉलिवूडमध्ये आता विविध विषयांवर, संकल्पनेवर आधारित चित्रपट येत आहेत. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटांना चांगला प्रतिसाद लाभताना दिसत आहे. अंधाधून, बधाई हो, छिछोरे, ड्रिम गर्ल, बदला, स्त्री, केसरी अशा अनेक चित्रपटांचा यात समावेश आहे. अशीच एक वेगळी कथा सांगणारा 'दी स्काय इज पिंक' चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झाला. समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद लाभला असतानाही या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई ही अत्यल्प होती. 

'टाईमपास'मधली ही अभिनेत्री 'गर्ल्स'मध्ये मुख्य भूमिकेत

पहिल्या दिवशी या चित्रपटानं केवळ २.५० कोटींची कमाई केली. भारतात हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो 'टोरेंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला तिथे चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपट संपल्यानंतर सर्व मंडळीनं उभं राहून टाळ्यांच्या गडगडात चित्रपटाची प्रशंसा केली.

पुष्कर- अमृताची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर

खूप लहान वयात जगाचा निरोप घेणारी प्रभावी वक्ता आयशा शर्मा हिच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वसीम यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सोनाली बोसनं केलं आहे.