पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'दी लायन किंग' ठरला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा हॉलिवूड चित्रपट

दी लायन किंग

नव्वदच्या दशकात जन्मलेल्या अनेक मुलांना 'दी लायन किंग' ही कार्टुन मुव्ही परिचयाची असेन. यातील 'सिम्बा' या पात्रावर याच नावानं आलेली कार्टुन सीरिजही  खूप लोकप्रिय ठरली होती. या दोघांनाही लहानांसह मोठ्यांचाही भरभरून प्रतिसाद मिळाला होता. 

भारतातल्या या ठिकाणी 'सुपर ३०' ची सुपरहिट कमाई

नुकताच 'दी लायन किंग'चा रिमेकही प्रदर्शित करण्यात आला. इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, तामिळ भाषेतही हा चित्रपट देशभरात १९ जुलैला प्रदर्शित झाला. या चित्रपटानं तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. चित्रपटानं जवळपास ५४.७५ कोटींची कमाई केली आहे. 
२०१९ मध्ये भारतीय बॉक्स ऑफिसवर कमी कालावधीत एवढी कमाई करणारा हा 'अॅव्हेंजर्स'नंतरचा दुसरा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

यापूर्वी 'जंगल बुक'नं ४०.१९ कोटींची कमाई केली होती.  'दी लायन किंग'नं पहिल्या दिवशी ११. ०६ कोटी, दुसऱ्या दिवशी १९.१५ कोटी आणि रविवारी  सर्वाधिक म्हणजेच २४.५४ कोटींची कमाई केली आहे. 

अभिनेत्री गायत्री जोशी ऑबेरॉयच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरून लुटले ४० हजार

'दी लायन किंग' च्या हिंदी व्हर्जनसाठी अभिनेता शाहरूख खान, त्याचा मुलगा आर्यन खान, श्रेयस तळपदे यांसारख्या कलाकारांनी आवाज दिला आहे.