पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'दी लायन किंग'ची भारतात १५० कोटींहून अधिकची कमाई

दी लायन किंग

गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'दी लायन किंग'ची  जादू अद्यापही भारतीय प्रेक्षकांवर आहे. या चित्रपटानं भारतात १५० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होऊन २४ दिवस उलटले आहेत. 

'खतरो के खिलाडी'मध्ये जाण्यापूर्वी आईचा अमृताला हा मोलाचा सल्ला

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटानं एकूण १५०. ९ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचा समावेश भारतात डिझ्नेच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत झाला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचा समावेश २०१९ मधल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीतही झाला आहे. 

मुलीची हत्या करून ४० वर्षांच्या मराठी अभिनेत्रीची आत्महत्या

इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, तामिळ भाषेतही  'दी लायन किंग' प्रदर्शित झाला होता. नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अॅनिमेटेड चित्रपट 'दी लायन किंग'चा हा रिमेक आहे. 'दी लायन किंग' च्या हिंदी व्हर्जनसाठी अभिनेता शाहरूख खान, त्याचा मुलगा आर्यन खान, श्रेयस तळपदे यांसारख्या कलाकारांनी आवाज दिला आहे.