पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'दी लायन किंग'नं पाच दिवसांत कमावले इतके कोटी

दी लायन किंग

गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला  'दी लायन किंग'सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. हा चित्रपट हिंदीतही भारतात प्रदर्शित करण्यात आला आहे.  या चित्रपटातलं सिम्बा हे कार्टुन कॅरेक्टर नव्वदच्या दशकात जन्मलेल्या अनेक मुलांसाठी खूपच जवळचं होतं. सिम्बा या नावानं  कार्टुन सीरिजही  आली होती.  नव्वदच्या दशकातील या लोकप्रिय  चित्रपटाचा रिमेक काढण्यात आला आहे.  या चित्रपटाला भारतीय प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

जमावाकडून होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कलाकारांचं पंतप्रधानांना पत्र, कडक शिक्षेची मागणी

चित्रपटानं पाच दिवसांत ६९.६७ कोटींची कमाई केली असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आर्दशनं दिली आहे. 
 'दी लायन किंग'नं पहिल्या दिवशी ११. ०६ कोटी, दुसऱ्या दिवशी १९.१५ कोटी आणि रविवारी  सर्वाधिक म्हणजेच २४.५४ कोटी, सोमवारी ७.९० आणि मंगळवारी ७.०२ कोटींची कमाई केली आहे.  २०१९ मध्ये भारतीय बॉक्स ऑफिसवर कमी कालावधीत एवढी कमाई करणारा हा 'अ‍ॅव्हेंजर्स'नंतरचा दुसरा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

 आसाम पूरग्रस्तांसाठी बिग बींनी केली ५१ लाखांची मदत

इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, तामिळ भाषेतही  'दी लायन किंग' प्रदर्शित झाला आहे. 'दी लायन किंग' च्या हिंदी व्हर्जनसाठी अभिनेता शाहरूख खान, त्याचा मुलगा आर्यन खान, श्रेयस तळपदे यांसारख्या कलाकारांनी आवाज दिला आहे.